बाजार विभाग

गुळ गोडावून विभाग

भुसार बाजार विभागातील जागेत गूळ या शेतीमालासाठी दोन गोडावून बांधले आहेत. या दोन गोडावूनचे बांधकाम फ्रेम स्ट्रक्चरचे असून ५० फूट स्पॅनचे अखंड बीम आहेत. गूळ व इतर शेतीमाला साठवणूक व विक्री व्यवस्था सुलभ व सुव्यवस्थित व्हावी यासाठी गोडावूनची सोय बाजारपेठेत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एका गोडावून मध्ये २५ हजार याप्रमाणे दोन गोडावून मध्ये मिळून ५० हजार गूळ साठविणेची सोय आहे. प्रत्येक गोडावूनची भुसार माल साठविणेची क्षमता १७००० क्विंटल इतकी आहे. सदर गोडावून लगत संड्रीशॉप्स दुकाने बांधली आहेत. यातील प्रत्येक गोडावूनची लांबी २०४ फूट, रुंदी ५१ फूट क्षेत्रफळ १०४०४ चौरस फूट आहे. ए टाईप गोडावूनच्या लगत उत्तर बाजूस १८ व बी टाईप गोडावूनच्या लगत दक्षिण बाजूस १८ अशी ३६ दुकाने बांधण्यात आली आहेत. प्रत्येक दुकानाची लांबी १५ फूट व रुंदी १०/७ फूट असून प्रत्येक दुकानाचे क्षेत्रफळ १६१ चौरस फूट आहे. सदरची दुकाने बाजार समितीच्या परवानाधारक नियंत्रित शेतीमालाच्या व्यवसायासाठी भाडेपट्ट्याने वाटप केली आहेत.

परवाना / भुसार विभाग

भुसार बाजारात ए, बी, सी, डी, एफ व संन्ड्री शॉप्स या प्रमाणे निरनिराळ्या टाईपचे प्लॉटस पाडले असून ते प्लॉट आडते व व्यापारी यांना नियंत्रित शेतीमालाच्या व्यवसायासाठी तीस वर्षाच्या मुदतीने भाडेपट्ट्याने वाटप केलेले आहेत. प्लॉटधारकांनी त्यावर बांधकाम केले असून त्या ठिकाणी ते नियंत्रित शेतीमालाचा व्यवसाय करीत आहेत. भुसार बाजारातील प्लॉट संख्या व वाटप प्लॉटची संख्या याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

हमाल तोलार विभाग

श्री.सिध्देश्वर बाजार समितीच्या परवानाधारक हमाल व तोलार यांना त्यांच्या औषधोपचारासाठी व त्यांच्या मुलामुलीच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यासाठी बाजार समितीच्या उपविधीमध्ये तरतूद करण्यात आली आहे.

सन २०२४-२०२५ या वर्षात औषधोपचारासाठी तीन स्त्री हमाल यांना रुपये १००००/-, बारा पुरुष हमाल यांना रुपये ६००००/- व सहा तोलार यांना रुपये ३००००/- इतकी आर्थिक मदत देण्यात आली आहे, याप्रमाणे एकूण रुपये १०००००/- इतकी आर्थिक मदत देण्यात आली आहे.

जनावर व कडबा बाजार विभाग

श्री. सिध्देश्वर बाजार पेठ या मुख्य बाजार आवारात टी. पी. २ फायनल प्लॉट नं. ९७ च्या जागेत या शेतीमालाची विक्री केली जाते व सदर जागेत दर मंगळवारी जनावरांचा बाजार भरतो. सदरच्या जनावर बाजार विभागात जनावरांसाठी २५ x ५० फुट या आकाराचे १२ शेड बांधले आहेत. तसेच पाण्यासाठी बोअर, हातपंप व विहीर आहे. कँन्टीन कम शेड बांधले आहे. जनावरासाठी धक्का कट्टा बांधला आहे, कंपाउंड वॉल बांधली आहे. जनावर व कडबा बाजारात दगडी खुट्ट्या, पाण्याचा हौद, वॉटर ट्रप्स, पत्रा शेड, व इत्यादी सोयी केल्या आहेत.

२६/२/२०१३ पासून जनावर व कडबा बाजारात बाजाराचे दिवशी स्टॉल होल्डर्स यांस रुपये दहा हातगाडीवाले यास रुपये पाच व इतर मालाचे विक्रते यांना रुपये दहा याप्रमाणे भुईभाडे साठी लायसेन्स आकारली जाते.

फायनल प्लॉट नं. ९७ च्या जागेत एक हजार मे.टन क्षमतेचे शीतगृह आहे. फायनल प्लॉट नं. ९७ च्या जागेत १०० x १०० फूट या आकाराचा प्लॉट टेलीकम्युनिकेशन सोलापूर यांना टेलीफोन एक्सेंजसाठी तीस वर्षाच्या मुदतीसाठी भाडेपट्टयाने दिला आहे. फायनल प्लॉट नं. ९७ च्या जागेत डाळिंबासाठी ऑक्शन सेलहॉल मध्ये एकुण ३० दुकाने बांधले आहे.